औरंगाबाद येथे ‘मैत्री सुमिरन पर्वा’ची लाखो भाविकाच्या उपस्थितीत सुरवात

औरंगाबाद, १ जानेवारी २०२३ : योगी डिव्हाइन सोसायटी पवई, मुंबई व श्री स्वामीनारायण हरिमंदिर हिरण्यनगर, उल्कानगरी, औरंगाबाद यांच्यातर्फे शुक्रवारी (ता. ३१ डिसेंबर २०२२) व शनिवारी (ता. १ जानेवारी २०२३) प.पू. कांती काका शताब्दीनिमित्त ‘मैत्री सुमिरन पर्व’ या महोत्सवाचे प.पू. संत भरतभाई व प.पू. संत वशीभाई यांच्या प्रेरणेने पी. बी. इस्टेट, किंग सिटी, बीड बायपास रोड, औरंगाबाद येथे आयोजन करण्यात आले आहे.

‘मैत्री सुमिरन पर्वा’ची उत्साहात सुरवात भागवत कथाकार प.पू. संत विजयप्रकाश स्वामी यांच्या सुमधुर स्वागतपर गीताने झाली. त्यानंतर रथयात्रा काढण्यात आली. रथामध्ये संत भगवंत साहेबजी, प.पू. दिनकरभाई, प.पू. प्रेमस्वरूप स्वामी, प.पू. विज्ञानस्वामी, प.पू. नरनारायणस्वामी, प.पू. अश्विनभाई, प.पू. भरतभाई, प.पू. वशीभाई आदी विराजमान होते. उपस्थित सर्व संत-महंतांचे यथोचित स्वागत करण्यात आले.

या ‘मैत्री सुमिरन पर्व’मध्ये अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पॅरिस, तसेच दिल्ली व गुजरात येथून स्वामीनारायण संप्रदायाचे अनेक संत येणार आहेत. यात मुख्यत्वे संत भगवंत साहेबजी, प.पू. गुरुजी, प.पू. निर्मल स्वामीजी प.पू. प्रेमस्वरूप स्वामी, प.पू. त्यागवल्लभ स्वामी, प.पू. दास स्वामी, प.पू. नरनारायण स्वामी, प.पू. विज्ञान स्वामी; तसेच अमेरिकेतील प.पू. संत दिनकर भाई, प.पू. संत अश्विन भाई उपस्थित राहणार आहेत. त्यासोबतच संप्रदायातील संत भगिनी प.पू. हंसा दीदी, प.पू. आनंदी दीदी, प.पू. सौजन्य बहन, प.पू. जयश्री बहन, प.पू. माधुरीबेन उपस्थित राहून आशीर्वाद देणार आहेत.

यावेळी पॅरिस येथील प.भ. अंकुर भाई यांनी सांगितले, की आत्मबुद्धी आणि प्रीती या सूत्रामुळे स्वामीनारायण संप्रदायाचे व योगी डिव्हाइन सोसायटीचे संस्थापक प.पू. गुरुहरी काकाजी महाराज व त्यांचे परम सखा प.पू. कांती काका यांची घनिष्ठ मैत्री होती. आपल्या गुरू आज्ञेने या दोन्ही गुणातीत स्वरूपांनी जीवनभर स्वामीनारायण संप्रदायाचे आध्यात्मिक कार्य सर्वदूर पसरविले.

कार्यक्रमास संस्कार ड्रीम शाळेचे डायरेक्टर डॉ. गजानन नालमवार व प्रिन्सिपल सौ. नीता नालमवार, प्रसिद्ध उद्योगपती श्री. बच्चूभाई पटेल, शिक्षणमहर्षी व विविध शैक्षणिक संस्थांचे सर्वेसर्वा श्री. जे. के. जाधव व माजी काँग्रेस अध्यक्ष विनायकराव बोरसे पाटील यांची उपस्थिती होती.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा