इंदापूर, दि.२८ मे २०२०: तालुक्यातील कांदलगाव येथे बुधवारी( दि.२७) दुपारी एकावर पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
याबाबत फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे फिर्यादी बापू दाजी जाधव (वय ५२) रा.कांदलगाव येथून सरडेवाडी नजीक रेडकर वस्तीहून कांदलगाव कडे जाणाऱ्या मार्गावर पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणाहून आरोपी योगेश जाधव,बाळू जाधव ,मल्हारी जाधव आणि त्यांच्या ४ साथीदारांसह फिर्यादी बापू जाधव यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवार आणि लोखंडी गजाने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरोपींवर भादवि कलम ३०७, ३२४, ५०६, १४३, १४७, १४८,१४९,३४१,आर्म ऍक्ट ४(२५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस लोकरे करीत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे