नवी दिल्ली, ९ मे २०२१: राष्ट्रीय महामार्ग ओलांडून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनची (एलएमओ) वाहतूक करणार्या टँकर व कंटेनरना टोल प्लाझा येथे कोणताही टोल भरावा लागणार नाही . कोविड -१९ महामारीमुळे देशभरातील वैद्यकीय ऑक्सिजनची सध्याची अभूतपूर्व मागणी लक्षात घेता, द्रवरूप वैद्यकीय रुग्णवाहिकांसारख्या अन्य आपत्कालीन वाहनांप्रमाणेच दोन महिने किंवा पुढील आदेशापर्यंत ऑक्सिजन असलेल्या कंटेनरला गणले जाईल.
फास्टटॅगच्या अंमलबजावणीनंतर टोल प्लाझा जवळ प्रतीक्षा काळ जवळपास संपुष्टात आला असला तरी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वैद्यकीय ऑक्सिजनच्या शीघ्र आणि सलग वाहतुकीसाठी अशा वाहनांना आधीच मार्गिका प्राधान्य दिले आहे. प्राधिकरणाने त्याच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि इतर हितधारकांना महामारी विरोधात लढा देण्यासाठी सरकार आणि खासगी प्रयत्नांना कृतीशील मार्गाने मदत करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.
कोविड -१९ च्या उद्रेकामुळे देशभर द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनची मोठी मागणी निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या संकटाच्या वेळी, कोविड -१९ पासून गंभीररित्या बाधित रूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी रुग्णालयांमध्ये आणि वैद्यकीय केंद्रांमध्ये द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन वेळेवर वितरित होणे महत्वाचे असते. टोल प्लाझावर वापरकर्ता शुल्क भरण्यात माफी मिळाल्याने राष्ट्रीय महामार्गांवर वैद्यकीय ऑक्सिजनची वेगवान वाहतूक सुनिश्चित होईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे