उत्तर प्रदेशमधील पंचायत निवडणुका आज, पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यात मतदान

उत्तर प्रदेश, १५ एप्रिल २०२१: उत्तर प्रदेशमधील पंचायत निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात आज १५ एप्रिल रोजी १८ जिल्ह्यात मतदान होणार आहे. १८ जिल्ह्यातील प्रमुख पदाच्या १४ जागांसाठी १४,७८९ उमेदवार रिंगणात आहेत. त्याचबरोबर ७७० जिल्हा पंचायत सदस्यांकरिता ११,७४९ उमेदवार रिंगणात आहेत. क्षेत्र पंचायत सदस्य (बीडीसी) च्या १९३१३ जागांसाठी ७१,४१८ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

पंचायत निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या १८ जिल्ह्यांत ८५ ग्राम प्रधान आणि ५५० क्षेत्र पंचायत सदस्य आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये १३ एप्रिल रोजी निवडणूक प्रचार थांबला आहे. या जिल्ह्यांमधील मतदान केंद्रांवर मतदान सामग्री पाठविण्याची प्रक्रियासुद्धा सकाळपासूनच सुरू झाली आहे.

या जिल्ह्यात मतदान होणार

यूपी पंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे त्यामध्ये सहारनपूर, गाझियाबाद, रामपूर, बरेली, हाथरस, आग्रा आणि कानपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त झांसी, महोबा, प्रयागराज, रायबरेली, हरदोई, अयोध्या, श्रावस्ती, संतकबीरनगर येथेही १५ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कार्यस्थळ असलेल्या गोरखपूरसह जौनपूर आणि भदोही येथे ग्रामपंचायत निवडणूक १५ एप्रिललाहोणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा