बारामती ४ फेब्रुवरी २०२१ : बारामती एसटी आगारातुन बारामती – पुणे विनाथांबा धावणाऱ्या शिवशाही गाड्यांच्या रोजच्या फेऱ्यांची संख्या वाढल्याने प्रवाश्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असुन मोठा मनस्ताप होत आहे.तर अनेकवेळा प्रवासी वेळेत पोहचण्यासाठी जीवधोक्यात घालुन अवैद्य वाहतुक करणाऱ्या वाहनाने प्रवास करावा लागत असल्याचे काही संतप्त प्रवाश्यांनी सांगितले.
रोजच्या बारामती -पुणे धावणाऱ्या विनाथांबा बस यामध्ये शिवशाहीची संख्या पंधरा असुन आगारात बरेच वेळा फलाट वर शिवशाही गाड्या असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.तसेच शिवशाहीला २०० रुपये तर साध्या लालपरीला १३५ रुपये तिकीट आहे.मात्र तुलनेत साध्य गाड्यांची संख्या कमी असल्याने नागरिकांना नाईलाजास्तव जास्त पैसे खर्च करुन शिवशाहीने प्रवास करावा लागत आहे.
बरेचवेळा साधी गाडी नसल्याने नाईलाजास्तव सुनियोजत स्थळी पोहचण्यासाठी खाजगी अवैद्य वाहनाने प्रवास करावा लागतो आहे.तर शिवशाही बसचे चालक हे प्रशिक्षित नसुन त्यांना कोणताही गणवेश नसतो अशी तक्रार प्रवाश्यांनी केली.तर अवैद्य वाहतूक करणाऱ्यांचे फावत असल्याचे प्रवाश्यांनी सांगितले कोरोना संसर्गामुळे एसटी महामंडळ आधीच तोट्यात असून आणखी आर्थिक फटका बसत असल्याची कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे.अनेक वेळा अवैद्य वाहतूक करणारे एसटीच्या तिकीट रांगेतून प्रवाश्यांना खाजगी वाहनाकडे घेऊन जातात याठिकाणी एसटी आगराचे नियंत्रक उपस्थित नसतात तर शिवशाही गाडी मध्ये प्रवाश्यांची संख्या कमी असताना देखील गाडी सोडली जात असल्याने एसटीला तोटा सहन करावा लागतो तर साध्या लालपरी गाड्यांची संख्या वाढवण्याची प्रवाश्यांची मागणी आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव