लॉकडाऊनमध्ये शासकीय दवाखान्यांमध्ये प्रसुतीसाठी महीलांची पसंती

पुरंदर, दि. १ जुलै २०२०: लॉकडाऊन मुळे खाजगी दवाखान्यात जाणारे रूग्ण शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रा कडे वळाले. येथील सेवा पाहून आता लोकांचा ओढा प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु झाला आहे. आता दररोज शेकडो लोक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेताना दिसतात. त्याचबरोबर प्रसूतीसाठी महिलासुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्राला पसंती देत आहेत.

पुरंदर तालुक्यातील नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक हॉस्पिटल्स बंद झाली. त्यामुळे लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून निरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पुढे आलं. या काळात जे रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल झाले. त्या सर्वांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नैसर्गिक प्रसुती करण्यात आल्या.विशेष म्हणजे या प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये या काळात एकही सिझेरियन प्रसूती करण्याची वेळ आली नाही. किंवा रुग्ण बाहेर पाठवण्यात आला नाही. लॉकडाऊन काळात महिलांनी प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयालाच पसंती दिल्याचे दिसते. येथील कर्मचाऱ्यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला. तीन महिन्यांत येथे २७ प्रसुती करण्यात आल्या आहेत. एका दिवशी तर तीन प्रसुती करण्यात आल्या.

प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या बाह्य रुग्णांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. राज्य शासन लोकांच्या आरोग्य सेवेसाठी करोडो रुपये खर्च करत असते. मात्र शासकीय दवाखान्याकडे लोकांनी मागील काळात पाठ फिरवली होती. त्यामुळे शासनाचा कोट्यवधीचा खर्च व्हायला जात होता. मात्र लॉकडाऊन मुळे अनेक लोक शासकीय दवाखान्यात उपचारासाठी आले आणि येथील उपचार पाहून इतरांना सुद्धा इकडे येण्याचा सल्ला देऊ लागले. अनावश्यक खर्च टाळत येथील कर्मचारी चांगला उपचार करत असल्याने आता प्राथमिक आरोग्य केंद्र वरील लोकांचा विश्वास वाढत चालला आहे. त्यामुळेच बाह्यरुग्ण बरोबरच महिला प्रसूतीसाठी प्रथम पसंती शासकीय रुग्णालयाला देऊ लागल्या आहेत. येथील महिला वैद्यकीय अधिकारी अश्विनी घाटगे या पुढे होऊन याकामी मदत करत असल्याने व येथील इतर कर्मचारी चांगले काम करत असल्याने ग्रामीण भागाच्या महिलांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र बद्दल विश्वास निर्माण झाला आहे. त्याचा फायदा ग्रामीण भागातील गरीब-श्रीमंत अशा सर्व स्तरातील लोकांना होत आहे.

लोकांनी इतरत्र जाऊन प्रसुतीसाठी अनावश्यक खर्च करण्यापेक्षा शासकीय दवाखान्यात येऊनच प्रसूती करावी. सुरुवातीपासून सर्व उपचार शासकीय दवाखान्यात घेतले तर अनावश्यक खर्च टाळता येईल. येथे सोनोग्रफी,रक्त तपासणी व विविध प्रकारची औषधे मोफत दिली जातात. लोकांनी याचा फायदा घ्यावा. असे आवाहन येथील वैद्यकीय अधिकारी अश्विनी घाटगे यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा