पंतप्रधान मोदी आज बेळगावातून करणार किसान सन्मान योजनेच्या १३ व्या टप्प्यातील १६ हजार कोटींच्या अनुदानाचे वितरण

बेळगाव, २६ फेब्रुवारी २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (ता.२७) बेळगाव दौऱ्यावर येत असून, नव्या रेल्वेस्थानकाचे उद्धाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर किसान सन्मान योजनेच्या १३ व्या टप्प्यातील १६ हजार कोटींच्या अनुदानाचे वितरणही पंतप्रधान बेळगावातूनच करणार आहेत. हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा होणार आहे.

कोरोना संकटात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू झाली असून, आतापर्यंत १२ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा झाले आहेत. १३ व्या हप्त्यातील १६ हजार कोटींच्या वितरणाचा प्रारंभ बेळगावातून होणार आहे. शिवाय अनेक प्रकल्पांचे उद्धाटनही पंतप्रधान मोदीच्या हस्ते होणार आहे.

किसान सन्मान योजनेअंतर्गत सुमारे ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट निधी जमा केला जातो. बारा हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. तेराव्या हप्त्याचे १६ हजार कोटी रुपये जमा करण्याच्या योजनेचा बेळगावातून प्रारंभ होणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. २ हजार याप्रमाणे तीन हप्त्यांत ही रक्कम दिली जाते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा