प्रा. डॉ. नितीन धवडे यांची हिंदी अभ्यास मंडळावर नियुक्ती

फलटण, २० फेब्रुवारी २०२३ : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम ४० (२)(ब)(ii) च्या तरतुदीनुसार मुधोजी महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. नितीन धवडे यांची शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मानव्यविद्या शाखेअंतर्गत पदव्युत्तर शिक्षक म्हणून हिंदी अभ्यास मंडळावर मा. कुलगुरूंच्या वतीने नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. नितीन धवडे हे गेली वीस वर्षे मुधोजी महाविद्यालयात हिंदी विषयाचे अध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये संसाधन व्यक्ती म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले असून, अनेक चर्चासत्रांमध्ये विविध विषयांवर त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्समध्ये त्यांचे वीस शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत; तसेच शिवाजी विद्यापीठ हिंदी प्राध्यापक परिषदेचे कार्यकारिणी सदस्य म्हणूनही ते सध्या काम पाहत आहेत.

या नियुक्तीबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी डॉ. नितीन धवडे यांचे विशेष अभिनंदन केले आहे; तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिलचे उपाध्यक्ष व सर्व सदस्य, प्रशासन अधिकारी यांनीही या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनीही डॉ. धवडे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा