पुणे, १५ मे २०२१: नुकताच राज्य सरकारने लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय घेतलाय. त्या विषयी नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे. मात्र पुणे मुंबई या शहरांमध्ये स्थिती चिंताजनक आहे. खासकरून पुण्यामध्ये संसर्गाचा प्रादुर्भाव जास्त असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. यानुसार आता पुणे महानगरपालिकेने देखील पुणे शहरासाठी नवीन प्रतिबंधात्मक नियमावली जाहीर केली आहे. यानुसार महाराष्ट्रा बाहेरील राज्यातून पुणे महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही वाहतुकीच्या साधनामार्फत प्रवेश करणाऱ्या व करु इच्छिणार्या सर्व नागरिकांना महापालिका क्षेत्रात प्रवेश करणेपूर्वी ४८ तास वैधता असणारे कोविड-१९ निगेटिव्ह (RTPCR) प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे.
काय आहेत नवीन निर्बंध
१) पुणे महापालिका क्षेत्रामध्ये कोविङ-१९ च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी इकडील दि.१४.०४.२०२१. दि.१७.०४.२०२१. दि. २०.०४.२०२१, दि. २२.०४.२०२१ व दि.३०.०४.२०२१ रोजी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना यापुढे दिनांक ०१ जून २०२१ सकाळी ०७.०० वाजेपर्यंत लागू राहतील.
२) पुणे महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही वाहतुकीच्या साधनामार्फत प्रवेश करणाऱ्या व करू इच्छीणाऱ्या सर्व नागरिकांना महापालिका क्षेत्रात प्रवेश करणेपूर्वी ४८ तास वैधता असणारे कोविड-१९ निगेटिव्ह (RTPCR) प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे.
३) महाराष्ट्र शासनाकडील दिनांक दि. १८ एप्रिल २०२१ आणि ०१ मे २०२१ रोजी देण्यात आलेल्या आदेशानुसार Sensitive Origins असलेल्या राज्य आणि संबंधित ठिकाणावरून येणाल्या नागरिकांसाठी निश्चित करण्यात आलेले निर्बंध हे सद्यस्थितीत भारतातील कोणत्याही राज्यामधून पुणे महापालिका कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या नागरिकांना जसेच्या तसे लागू राहतील.
४) माल वाहतूक करणाऱ्या वाहनामधून २ पेक्षा जास्त नाही अशा व्यक्तींना ( चालक + क्लीनर /मदतनीस) प्रवास करणेस परवानगी राहील. जर असे माल वाहतूक करणारी वाहने बाहेरच्या राज्यामधून येत असतील, तर अशा वाहनातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींना पुणे महापालिका कार्यक्षेत्रामध्ये प्रवेश करण्याच्या वेळी ४८ तास वैधता असणारे कोविड १९ निगेटिव्ह (RTPCR) प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे. सदर अहवाल हा ७ दिवसा पर्यंत वैध असेल.
५) पुणे महापालिका क्षेत्रातील दूध संकलन केंद्र, दुध वाहतूक व दूध प्रक्रिया केंद्र कोणत्याही बंधनाशिवाय सुरु राहतील. जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या आस्थापना व दुकानांमधून दुधाची किरकोळ विक्री करण्यास किंवा घरपोच डिलिव्हरी करण्यास यापूर्वी निर्गमित केलेल्या नियम आणि प्रमाणेच नियम लागू राहतील.
६) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विमानतळ व पोर्ट सेवा प्रशासनाशी निगडीत अधिकारी / कर्मचारी, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांच्या वाहतुकीशी निगडीत अधिकारी / कर्मचारी यांना सर्व लोकल रेल्वेसेवा मधून प्रवास करण्यास परवानगी असेल.
७) संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे