लातूर ५ डिसेंबर २०२३ : UGC ने सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना पत्रा द्व्यारे अ.भा.वि.प.चे संस्थापक दत्ताजी डीडोळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचा सम्यक विद्यार्थी आंदोलन वतीने महाराष्ट्रभर जाहीर निषेध करण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यात कोणत्याच महाविद्यालयामध्ये ABVP चे संस्थापक यांची जन्मशताब्दी साजरी करू देणार नाही, असा इशारा वर्षा घुगे मैडम जिल्हाधिकारी लातूर यांच्या मार्फत UGC ला देण्यात आला.
त्याच अनुषंगाने वर्षा घुगे, जिल्हाधिकारी लातूर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन, लातूर जिल्हाध्यक्ष नागेश सातपुते , जिल्हाउपाध्यक्ष रोहित साबळे, रोहन सावंत, जिल्हा महासचिव करण जी इंगळे, जिल्हा कोषाध्यक्ष विशाल कांबळे, जिल्हा सदस्य सचिन कांबळे, तालुका अध्यक्ष आदित्य आल्टे, शहर अध्यक्ष ऋतिक सुरवसे, सदस्य अकबर गवंडगावे आणि सर्व पदाधिकारी उपस्थिती होते.
न्युज अनकट प्रतिनीधी : सलीम शेख