नवी दिल्ली(वृत्त संस्था) : सना मरीन या फिनलंडच्या नव्या पंतप्रधान आहेत. सना मरीन या अवघ्या ३४ व्या वर्षाच्या आहेत, तरी देखील त्यांनी ही जबाबदारी पेलली आहे. फिनलंडमध्ये सोशल डेमोक्रॅटिक पक्षाचे सरकार आले आहे.
सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या सना मरीन या जगातल्या सध्याच्या सर्वात तरुण पंतप्रधान ठरल्या आहेत.
त्या अवघ्या २७ व्या वर्षी महापौर होत्या. फिनलंडमध्ये पाच पक्षांच्या आघाडीचे सरकार आहे.
विशेष म्हणजे फिनलंडमध्ये महिलांचा राजकीय क्षेत्रातला सहभाग लक्षणीय आहे. सध्या पाच पक्षांच्या आघाडीचे सरकार आहे.
त्यामधल्या तीन पक्षांच्या प्रमुख या महिला आहेत.
१९०७ साली फिनलंडच्या संसदेत महिला लोकप्रतिनिधींचे प्रमाण फक्त साडे नऊ टक्के होते. आता फिनलँडच्या संसदेत ४७ टक्के महिला लोकप्रतिनिधी आहेत.