संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला पुण्यातून अटक

पुणे, ४ जानेवारी २०२४ : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात पोलिसांना यश आलय. मात्र तिसरा फरार आरोपी कृष्णा आंधळे अजून पोलिसांना सापडलेला नाही. पोलीस सध्या त्याच्या मागावर असून लवकरच त्यालाही जेरबंद करण्यात येईल, असे तपास यंत्रणेकडून सांगण्यात आलंय.

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच अपहरण करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना ९ डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, प्रतिक घुले, विष्णू चाटे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आता यातील फक्त कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे.

दरम्यान, देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांच्या कुटूंबीयांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष बाब म्हणून १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. शुक्रवारी 10 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला.

न्युज अनकट प्रतिनिधी : भाग्यश्री शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा