भारतीय रियल इस्टेट सलाहकार वेल्फेअर असोसिएशनची दुसरी बैठक संपन्न

नागपूर, २३ फेब्रुवारी २०२४ : भारतीय रियल इस्टेट सलाहकार वेल्फेअर असोसिएशन, नागपूरची दुसरी बैठक नुकतीच पंधरा फेब्रुवारीला विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या मधुरम सभागृहात पार पडली. यावेळी संघटनेचे सचिव मोहन बळवाईक, कार्यकारी अध्यक्ष के. एम. सुरडकर, संस्थापक अध्यक्ष राजविरसिंह व प्रमुख अतिथी म्हणून प्रो. डॉ. सानिया खान प्रामुख्याने उपस्थित होत्या.

याप्रसंगी बळवाईक यांनी सलाहकार यांच्यावर होणारे अत्याचार सहन करणार नाही व सांख्यिकी माहिती देत या संघटनेचे लक्ष व आगामी योजना सांगत त्यांना जास्तीत जास्त संख्येने या संघटनेत जुडण्याचे आवाहन केले. के. एम. सुरडकर म्हणाले, मागील चुका सुधारून आता आपण त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढत विजिट संबंधी, फाईनल डिल, कमीशन आदि संबधी योग्य दस्तावेज मार्केटिंग कंपन्या, विकासक, बिल्डर्स व सलाहकारांच्या हस्ताक्षराने या दोघांमध्ये पूराव्याच्या रुपात राहतील तेव्हा भविष्यात धोखाधडी संबधी घटना घडणारच नाही असे आश्वस्त केले.

दुसऱ्या बैठीकीचे डॉ.सानिया खान विशेष आकर्षण होते. डॉ.सानिया खान राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय जनता मजदूर ट्रेड युनियन कौन्सिल, नवी दिल्ली, तसेच राष्ट्रीय संयोजिका अल्पसंख्याक प्रकोष्ठ, महात्मा गांधी विचार मंच व पेश्याने BAMS काॅलेजच्या प्राध्यापिका आहेत त्यांनी सांगितले की, अशा संघटनांची आवश्यकता व औपचारिक घोषणा होणे काळाची गरज आहे. सर्वच कामगार जे महत्वाचा दुवा आहे त्यांच्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे व त्यामुळेच अशा संघटनांची गरज आहे. या संघटनेचे उदिष्ट पूर्ण करण्यास त्या केंद्राच्या सरकारचे लक्ष वेधतील व संघटनेच्या मजबुतीकरिता नेहमीच मदत करतील. त्यांनी संघटनेचे स्वागत करून मुद्देसूद मार्गदर्शन केले.

माझ्या शब्दाला मान देऊन तुम्ही एवढा वेळ माझ्यासाठी दिल्याबद्दल खूप खूप आभार असे बोलत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजविरसिंह यांनी नेमक्या कामाच्या गोष्टी करुन सर्वांचे मन जिंकले आणि मिटिंगमध्ये नविन विचार मांडण्यासाठी बैठकीची वेळ खूप चांगला होती. त्यांनी म्हटले मला माहित नाही, आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो. पण जे काही करता येईल ती करायची तयारी मात्र नक्कीच ठेवतो. पोटात एक आणि ओठात एक हे मला कधीच जमले नाही आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे समोरील व्यक्तींचे दुःख जाणून त्याला योग्य ती मदत देईन. नेहमीच छोट्या- मोठ्या रिअल इस्टेट मार्केटिंग कंपन्या, ब्रोकरेज कंपन्या, गुंतवणूकदार आणि ग्राहक आम्हा सलाहकारांना असहाय आणि अज्ञान मानून त्यांचा गैरफायदा घेऊन कायदेशीर युक्त्या युक्ती करुन त्यांना त्यांच्या कमाईपासून वंचित ठेवतात. त्यांना कायमस्वरूपी हक्काची कमाई मिळवून देण्यासाठी मी व माझी संघटना सैदव तत्पर राहीन आणि त्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळवून देईल, असंही ते म्हणाले.

सर्व काही कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी, प्रशिक्षित करण्यासाठी व त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आम्ही सरकारला विनंती करणार आहोत की जे महारेरा नोंदणीकृत आहेत. त्यांना २० लाख ग्रुप विमा आणि ५ लाख रुपयांचा वैद्यकीय विमा सहाय्यता रक्कम मिळावी. ५ लाख वैद्यकीय विम्याची रक्कम किमान पाच वर्षांसाठी असावी. महारेरा नोंदणी पूर्वीप्रमाणेच केली जावी. या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि उत्पन्न नसलेल्या कमी शिक्षित सल्लागारांवर किंवा सेवानिवृत्त लोकांवर परीक्षेचा भार न टाकता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा दंड आकारण्यात येऊ नये. तसेच एक नव्याने आयोग बनवून योग्य मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत आणि महारेरा सल्लागारांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात यावी. तसे एक ज्ञापन मा. पोलिस आयुक्त, महारेरा संचालक व महाराष्ट्र राज्य सरकारला लगेच देऊ असे आश्वासन यावेळी दिले असता या बैठकीत सल्लागारांनी सर्व सल्ले मान्य करीत अनुमोदन दिले. या कार्यक्रमाचे संचालन बँकेचे माजी व्यवस्थापक प्रवक्ते आनंद कोहाड यांनी केले आणि सल्लागारांचा उत्साह वाढवण्यात यश मिळवले. तर आभार संघटनेचे उपाध्यक्ष संजय खोब्रागडे यांनी मानले

न्यूज अनकट प्रतिनीधी : नीता सोनवणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा