मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नाशिक जिल्हा कार्यालयावर लॉंग मार्च

नांदगाव, नासिक, २३ फेब्रुवारी २०२४ : नासिक जिल्ह्यातील नांदगाव येथे कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरातून आंबेडकर चौक येथून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात कॉम्रेड धर्मराज शिंदे, जिल्हा नेते किसान सभा यांच्या नेतृत्वाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नाशिक जिल्हा कार्यालयावर शेतकरी कष्टकरी सोमवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी धडकणार असल्याचे सांगितले आहे.

नांदगाव तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी, कष्टकरी बांधव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून नाशिककडे विविध मागण्यांसाठी लॉंग मार्च करत रवाना झाले. या लॉंग मार्च मध्ये काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष मनोज चोपडे यांनी सर्वांचे स्वागत करत जाहीर पाठिंबा दिला.

मोदी सरकारचे धोरण हे कष्टकरी शेतकरी यांच्या विरोधी असून दिल्ली येथे शेतकऱ्यांवर अश्रू धुराचा वापर करून गोळ्या झाडण्यात येत आहे. या दडपशाहीचा मुकाबला सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांनी केला पाहिजे. भारतीय संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन काँग्रेस शहराध्यक्ष मनोज चोपडे यांनी आपल्या शब्दातून केले आहे. यावेळी असंख्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनीधी : नाना आहिरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा