जम्मू काश्मीर, दि. ७ जून २०२०: काश्मिरमध्ये दहशतवाद्यांविरूद्ध सुरक्षा दलाचे अभियान सुरू आहे. दक्षिणेकडील काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील रेबेन भागात रविवारी अतिरेकी आणि सुरक्षा दलातील चकमकीस सुरुवात झाली, सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोपियांच्या रेबन गावाला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली. उपलब्ध माहितीप्रमाणे २ ते ३ अतिरेकी या भागात लपले असण्याची शक्यता आहे.
इंडिया टुडेला मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील रेबेन भागात रविवारी अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकी झाली. पोलिस, आर्मी ०१ आर आर आणि सीआरपीएफ यांनी संयुक्त ऑपरेशन करून रेबेन परिसर घेराव घालून शोध मोहीम सुरू केली.
सुरक्षा दलाची संयुक्त टीम संशयास्पद ठिकाणी पोहोचली तेव्हा लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याच वेळी सुरक्षा दलानेही प्रत्युत्तरात गोळीबार केला आणि मग चकमकीला सुरुवात झाली.
एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने सुरक्षा दलांची संयुक्त टीम आणि अतिरेक्यांमधील चकमकीची पुष्टी केली आहे . सूत्रांच्या माहितीनुसार २ ते ३ दहशतवादी अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी