आयपीएल २०२३ साठी शिखर धवन असंल पंजाब किंग्सचा नवीन कर्णधार

पुणे, ४ नोव्हेंबर २०२२ : आयपीएलच्या २०२३ आगामी हंगामाआधी पंजाब किंग्स संघानं आपल्या संघामध्ये मोठा फेरबदल केलाय. पंजाब किंग्सनं आयपीएलच्या २०२३ हंगामासाठी अनिल कुंबळे यांना मुख्य प्रशिक्षक पदावरून हटवल्यानंतर आता पंजाब संघाचा कर्णधार देखील बदलण्यात आलाय. पंजाब किंग्सचा कर्णधार मयांक अग्रवाल ऐवजी आता शिखर धवणची नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती केलीय.

मयांक अग्रवालच्या नेतृत्वात पंजाब किंग्सची कामगिरी निराशाजनक राहिली होती. त्यामुळं त्याला कर्णधार पदावरून हटवणं योग्य असल्याचं बोललं जात होतं. गेल्या वर्षी मेगा लिलावात पंजाबनं शिखर धवनला ८.२५ कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. त्याचबरोबर आयपीएल मेगा लिलावापूर्वी मयंक अग्रवाल आणि अर्शदीप सिंग यांना पंजाब किंग्सनं कायम ठेवलं होतं.

शिखर धवन यानं गेल्या वर्षी पंजाब किंग्स साठी त्यांच्या पदार्पणाच्या हंगामात १४ सामन्यात ३८.३३ च्या सरासरीने ४६० धावा केल्या होत्या. या धावा करताना त्यानं ३ अर्धशतकही झळकावली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा