शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा ९ फूट उंच पुतळा!….

मुंबई, २० जानेवारी २०२१: शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारीला जयंती आहे. त्या निमीत्ताने मुंबईच्या कुलाबा परिसरातील डाॅक्टर श्यामप्रसाद मुखर्जी चौकात बाळासाहेब ठाकरेंचा ९ फूट उंच पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. प्रसिद्ध शिल्पकार शशिकांत फडके यांनी हा पुतळा तयार केला आहे.
पुतळ्या खाली काय लिहिले?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हा पुतळा शशिकांत फडके यांनी तयार केलाय. तर पुतळ्याच्या चौथर्यच्या खाली “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो” असे शब्द कोरण्यात आले आहेत. जे बाळासाहेब ठाकरे त्यांच्या प्रत्येक भाषणात जनतेला संबोधन करताना म्हणत.

ठाकरे बंधू एकत्र….
येत्या २३ जानेवारीला हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असून, या कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र एकाच मंचावर दिसणार आहेत. या कार्यक्रमाचं निमंत्रण सर्वपक्षीय नेत्यांना दिलं जात आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कृष्णकुंजवर राज ठाकरेंची भेट घेत त्यांना निमंत्रण दिले. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा