सोलापूर, पंढरपूर ३१ ऑक्टोबर २०२३ : संपूर्ण राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या गंभीर झालेला दिसत आहे. मराठा समाजाला लवकरात लवकर ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मराठा समाज संपूर्ण राज्यभरात आक्रमक झालेला आहे. राज्यात गेल्या दोन दिवसात घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, पंढरपूर एस टी आगाराने बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आक्रमक झालेल्या मराठा समाजाकडून अनेक गावांमध्ये पुढाऱ्यांना गावबंदीही करण्यात आलेली आहे. सोलापूर जिल्हाही याला अपवाद राहिलेला नाही. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील एस टी बस सेवा आंदोलनाच्या धास्तीने बंद करण्यात आली आहे. या निर्णयाच येथील मराठा समाजातील बांधवांनी स्वागत केलय. शासनाचा निषेध करण्यासाठी तसेच मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळावे या मागणीसाठी पंढरपूर शहरातील मराठा समाजाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने बस स्थानक परिसरात उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : नवनाथ खिल्लारे