सुरक्षितपणे रहा लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये ….

पुणे, २ सप्टेंबर २०२२: कृतीका आणि ओजस, गेले पाच वर्ष विना लग्नाचे कोणालाही न सांगता रहात होते. अखेर एके दिवशी कृतिकाच्या आई-वडिलांना ही गोष्ट कळली. आणि तिच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.
कृतिकाने सगळं ऐकून घेतल्यानंतर तिने पेपर घेतला आणि त्यातून एक बातमी वाचून दाखवली. ज्यात कायद्याने लिव्ह इन रिलेशनशीपला मान्यता दिली होती. ज्यात त्यांनी कायदा आता लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये असलेल्या जोडप्याला सर्व सोयी मिळणार असल्याचे तिने दाखवले. मात्र तरीही ते ऐकून तिच्या आई-वडिलांनी काही प्रश्न निर्माण केले.

प्रश्न – लग्नाशिवाय रहाणं, तुम्हाला योग्य वाटतं का? याचा फायदा काय ?
उत्तर- लग्नाशिवाय रहाण्याचा मुख्य फायदा म्हणजे नात्याची गुंतवणूक नाही. तिथे सरळ साधा विचार समोर असतो. एका छताखाली दोघांनी विना मर्यादा राहणं. तसेच मतभेद झाल्यानंतर घटस्फोट न घेता वेगळं होऊ शकतो. आणि कालांतराने एकत्र येऊ शकतो.

प्रश्न- लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मुलगा-मुलगी यांचा जन्म झाल्यास मुलांना पालक म्हणून कोणाचे नाव लावाल?
उत्तर- यावर हा सर्वस्वी प्रश्न जन्म देणा-याचा आहे. त्यामुळे दोघांच्या संमतीने मुलाचे नाव ठेवण्याचा अधिकार दोघांना असतो.

प्रश्न- काही काळानंतर जर वाद- भांडण झाली आणि वेगळं झालो तर,
उत्तर- काही काळानंतर जर भांडणं, वाद झाल्यानंतर इच्छेने वेगळे होऊन नवीन आयुष्य जगण्यास दोघे मोकळे असतात.

तोटे-

लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर स्त्रियांचे वय वाढल्यानंतर काही वेळा स्रियांना अनेक मर्यादा निर्माण होतात. पण पुरुषांना अनेक चॉईस असतात.

लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये इमोशनल गोष्टींबरोबर प्रत्यक्ष अर्थात प्रॅक्टीकल गोष्टींना जास्त प्राधान्य दिले जाते. त्यामुळे हे नातं तुटल्यानंतर काही वेळेला जास्त त्रास होत नाही, असं अनेक स्त्रियांच्या बोलण्यातून आलं आहे.

यावर बोलताना अँड. प्रार्थना सदावर्ते यांनी सांगितलं की, लग्न संस्था काही दिवसात कमी होतील आणि पुरुष-स्त्रिया या लग्नाशिवाय रहाणं पसंत करतील.

लग्न म्हणजे बंधन, लग्न म्हणजे मर्यादा अशी धारणा सध्याच्या पिढीची झाली आहे. त्यामुळे आता लिव्ह इन रिलेशनशिपला तरुण पिढीकडून जास्त प्राधान्य मिळताना दिसत आहे, हे मात्र खरं. …

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा