टाटा ग्रुप ऑफ होटेल चा वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मदतीचा हात

मुंबई: राज्यात कोरोनाचा  फैलाव होत आहे. लॉकडाऊनमुळे सर्व शहरे धावायची थांबली आहेत. अनेक ठिणाकी वस्तूंचा आणि भाजीपाल्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसून आले आहेत. करोना रोगामुळे सध्या सुरू असलेला लॉकडाउनचा भयंकर परिणाम हा मुंबई आणि मुंबईतील सरकारी हॉस्पिटल मध्ये होताना दिसत आहे.

लोकांनी घरातून बाहेर पडू नये म्हणून दक्षता घेण्यासाठी पोलिस कर्मचारी तैनात आहे. तसेच दिवसरात्र रुग्णांची सेवा करण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर जातात आहेत. परंतु या धावपळीच्या काळात त्यांना वेळेवर अन्न आणि जीवन आवश्यक गोष्टींचा पुरवठा होत नसल्याचे दिसत आहे. अश्या परिस्थितीत टाटा ग्रुप ऑफ होटेल च्या वतीने मुंबईतील सरकारी हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टरांना मोफत जेवण पुरवण्याचे कार्य केले जात आहे. अश्या अडचणीच्या काळात टाटा ग्रुप ऑफ होटेल च्या वतीने पुढे केलेला हा माणुसकीचा हात उल्लेखनीय आहे. याच बरोबर अनेक सामाजिक संस्था देखील अश्या कामांमध्ये पुढाकार घेत आहेत. काही संस्था पोलिसांना देखील अन्न पुरवठा करत आहे.

सध्या कोरोनचे सर्वात जास्त दुष्परिणाम महाराष्ट्रावर झालेले दिसत आहे. कोरोनामुळे गुजरात, महाराष्ट्र आणि काश्मीरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. यासह, देशात कोरोना विषाणूची एकूण प्रकरणे ६५६ झाली आहेत. देशात कोरोनाची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात दिसून आली आहेत. येथे १२५ रुग्ण नोंदले गेले आहेत आणि ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना विषाणूमुळे भारतात १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा