कोरोना विषाणू सुद्धा एक जीवच आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार आहे, भाजपच्या नेत्याचे वक्तव्य

उत्तराखंड, १५ मे २०२१: देशात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाताना स्पष्ट दिसत आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार कोरोना काळात पुर्णपणे अपयशी झाल्याचे अनेक देशातील मोठ्या वृत्तसंस्थेने आरोप केलेत. जगाभरातून भारतावर टीका केली जाते, तर देशातील राजकारणी मात्र राजकारण थांबण्याचे नाव घेत नाही. केंद्रात सत्तेत असलेल्या नेत्यांनी काही अजबच दावे कोरोना ला घेऊन केले आहेत. तर इतर राज्यात उपचाराच्या नावाने काहीही चालू आहे.

गुजरात चे नाव संपूर्ण देशात मोठ्या तोऱ्यात घेतले जाते. तेथूनच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला लाभले. पण, तेथील जनता मात्र कोरोना उपचाराच्या नावाने अंगावर शेणाचा लेप लावून घेत आहेत. शेणाचा लेप अंगाला लावल्याने कोरोना दूर राहतो असे मत त्यांचे आहे. तर डाॅक्टरांनी यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत ही पद्धत फेटाळून लावली.

एकीकडे असे कार्य चालू असताना दुसरीकडे भाजपचे नेते आणि उत्तराखंड चे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी एक वेगळेच स्टेटमेंट केले आहे. “तसं पाहिलं तर कोरोना विषाणू सुद्धा एक जीवच आहे. बाकी जीवांप्रमाणे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. मात्र आपण (मनुष्य) स्वताला बुद्धीमान समजतो. आपण त्या विषाणू ला संपवण्यासाठी तयार आहोत. मात्र त्यामुळेच तो स्वतःमध्ये बदल करतोय. “असं त्यांनी म्हटले आहे.

देशातील जनता कोरोना महामारीशी लढा देत आहे तर सरकार उपाय योजना सोडून बघ्यांची भूमिका घेत आसल्याची टीका सोशल मीडियावर केली जात आहे. तर नुकतेच सोशल मिडीयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हारवले आसल्याची टीका जोर धरू लागली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा