भारतीय नौदलाचे तरकश हे जहाज ऑक्सिजन घेऊन मुंबईत दाखल

मुंबई, १३ मे २०२१: संध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ऑक्‍सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. अशा स्थितीत देशांतर्गत ऑक्सीजन निर्मितीची क्षमता देखील वाढवण्यात आली आहे. तसेच इतर देशांकडून देखील ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. या अंतर्गत काल पुन्हा परदेशातून ऑक्सिजनचा पुरवठा प्राप्त झाला आहे.

कोविड आपत्तीमध्ये सुरु असलेल्या मदतकार्याचा भाग म्हणून भारतीय नौदलाने सुरु केलेल्या ‘समुद्र सेतू २’ या मोहिमेअंतर्गत, वैद्यकीय वापरासाठीचा प्रत्येकी २० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन भरलेले दोन क्रायोजेनिक कंटेनर्स आणि २३० ऑक्सिजन सिलेंडर्स आणणारे भारतीय नौदलाचे आय.एन.एस.तरकश हे जहाज, काल, १२ मे २०२१ रोजी मुंबईत पोहोचले.

फ्रान्सच्या “ऑक्सिजन एकता सेतू” अभियानातून हे ऑक्सिजन कंटेनर्स देण्यात आले आहेत तर कतार मध्ये स्थायिक भारतीय समुदायाने भारताला भेट म्हणून ऑक्सिजन सिलेंडर्स पाठविले आहेत. आयएनएस तरकश जहाजावरून आलेला माल महाराष्ट्राच्या नागरी प्रशासनाकडे सोपविण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा