आज पासून सुरू होणार शरयु फाउंडेशन आयोजित “शरयु यशोगाथा” उपक्रम

बारामती:१ नोव्हेंबर २०२०: समाजात अनेकांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांचे यश पाहून आपल्याला नेहमीच आश्चर्य वाटतं. मात्र या यशामागे जे कष्ट, जो संघर्ष करावा लागला याबद्दल आपल्याला फारसं माहिती नसतं. त्यामुळंच शरयु फौंडेशनच्या माध्यमातून ’शरयु यशोगाथा’ हा शून्यातून विश्व निर्माण करणार्‍या मान्यवरांशी संवादाचा उपक्रम रविवार दि.१ नोव्हेंबर २०२० पासुन सुरु करण्यात आला असल्याचे शरयू फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.शर्मिलावहिनी पवार यांनी कळविले आहे.

बीड जिल्ह्यातील वंजारवाडीतून लंडन व्हाया पुणे हा प्रवास म्हणावा इतका सोपा नाही.. त्याचवेळी हजारो युवकांना प्रेरणा देणारा उद्योजक, लेखक बनणंही सोपं नाही.. मात्र ही गोष्ट साध्य केलीय लेखक, उद्योजक श्री. शरद तांदळे यांनी.. पुण्यासारख्या ठिकाणी येऊन धडपडत, कष्ट करत, अडचणींना सामोरे जात उद्योजक बनलेल्या शरद तांदळे यांच्या यशावर मोहोर उमटली ती इंग्लंडचे युवराज प्रिन्स चार्ल्स यांच्याकडून. त्यांच्या हस्ते श्री. शरद यांना लंडनमध्ये तरुण उद्योजकतेचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाला तेव्हा ते छत्तीस वर्षांचे होते.. आज शरद तांदळे हजारो युवकांसाठी प्रेरणास्थान आहेत. रावण, द आंत्रप्रण्योर अशी गाजलेली पुस्तकेही शरद तांदळे यांनी लिहिलीत.. अशा या बहुआयामी व्यक्तीमत्वाशी संवाद साधणार आहोत शरयु फौंडेशन आयोजित ’शरयु यशोगाथा’ या उपक्रमात रविवार दि.१ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता झूम ऍपवर हा संवाद उपक्रम पार पडेल. तसेच शरयु फौंडेशनच्या फेसबुक पेजवर आणि युट्यूब चॅनलवर आपल्याला हा संवाद लाईव्ह पाहता येईल.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा