बारा फुट अजगराची दहशत संपली; तब्बल नऊ बकऱ्या केल्या होत्या फस्त

चंद्रपूर, १० ऑक्टोबर २०२२: चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील उचली गावात गेल्या एका वर्षापासून एक अजगराची दहशत निर्माण झाली होती. अखेर त्या अजगराला पकडण्यात यश आले आहे. या अजगराने तब्बल नऊ बकऱ्या फस्त केल्या आहेत.

अशी माहीती गावकऱ्यांकडून देण्यात आली आहे‌. ग्रामस्थांना शेतशिवारात एक महाकाय आजगर नेहमी दिसत असे. त्यामुळे स्थानिक नागरिक लहान मुले त्या बाजूला जात नसत. गेले एक वर्षभर या परिसरात दहशतीचे वातावरण होते. दरम्यान शेतकरी ढोंगे यांची चौथी बकरी अजगराने मारली.

ही घटना शेतकऱ्याने अर्थ कंजरवेशन ऑर्गनायजेशन संस्था सदस्यांना दिली. सर्पतज्ञ ललित उरकुडे, विवेक राखडे, चेतन राखडे व ईशान वठे यांनी घटनास्थळावर धाव घेत मोठ्या शिताफीने अजगराला पकडले. महाकाय अजगर पकडल्यावर गावकऱ्यांनी एकच जल्लोश केला आणि सर्व गावकरीने संस्था सदस्यांचे आभार मानले.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा