एकाच वेळी महिलेने दिले ९ बाळांना जन्म

दक्षिण आफ्रिका, ७ मे २०२१ : जगात दरवेळी काही ना काही नवीन गोष्टी घडत असतात.आणि त्यात जर माणूस नावाच्या जीवनाबद्दल तर आजूनही कुतूहलच आहे. अशीच जगातील अंतत्य दुर्मिळ घटना दक्षिण आफ्रिकेत घडली आहे. दक्षिण आफ्रिकेतील एका महिलेनं नवरत्नांना जन्म दिला आहे. बसला ना धक्का पण हि घटना खरी आहे. हलिमा सिसा असे त्या महिलेचे नाव आहे.
हलिमा सिसा यांची गर्भवती असताना मोरोक्को आणि माली मधे अल्ट्रासाउंड यंत्रणेनं तपासणी करण्यात आली होती. ज्यामध्ये प्राथमिक अंदाजानुसार सात बाळांना जन्म देणार असल्याचे अपेक्षित होतं. त्या बरोबरच माली सरकारने हलिमा च्या वैद्यकीय उपचार आणि निगराणीसाठी तिला ३० मार्चला मोरोक्को ला पाठविण्यात आले. मंगळवारी हलिमाची सीजेरियन करून  प्रसूती करण्यात आली.
नऊ बाळांना दिला सुखरूप जन्म
हलिमा ने पाच कन्या आणि चार पुत्रांना जन्म दिला. डाॅक्टर हलिमा आणि तिच्या बाळांच्या प्रकृती विषयी जरा चिंतीत आसल्याचे समजले आहे. वैद्यकीय गुंतागुंत आणि एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिल्यामुळे हि चिंता डाॅक्टरांना वाटत आहे. तर या सगळ्या वेळात बाळांची वाढ पूर्ण झाली असेल कि नाही याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.
बाळांसह आईची प्रकृती ठीक आहेआहे असे आरोग्य मंत्री फान्टा सिबी यांनी सांगितले. तसेच हलिमा च्या प्रत्येक आरोग्याविषयी ची माहिती वैद्यकीय पथक आरोग्य मंत्री फान्टा सिबी यांना देते होते तसेच डाॅक्टर आणि वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा