नवी दिल्ली, १० मे २०२१: भारताबद्दल ऐक्य आणि सदिच्छा दर्शवत जागतिक समुदायाने कोविड – १९ विरोधातील सामूहिक लढाईत भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. भारताला प्राप्त झालेल्या मदत सामग्रीचे प्रभावी वाटप तसेच त्वरित वितरण आणि पुरवठा करण्यासाठी भारत सरकारने सुव्यवस्थित आणि पद्धतशीर यंत्रणा तयार केली आहे. मात्र तरीही ती प्रभावी पणे राबवली जात नसल्याचे दिसत आहे.
भारत सरकारला २७ एप्रिल २०२१ पासून विविध देशांकडून / संस्थांकडून आंतरराष्ट्रीय देणगी आणि कोविड-१९ वैद्यकीय मदत पुरवठा आणि मदत उपकरणे प्राप्त होत आहेत.
एकूण ६७३८ ऑक्सीजन काँसंट्रेटर्स, ३८५६ ऑक्सीजन सिलिंडर , १६ ऑक्सीजन उत्पादन संयंत्र, ४६६८ व्हेन्टिलेटर्स /बीआय पीएपी, रेमडेसिव्हीरच्या सुमारे ३ लाख कुप्या २७ एप्रिल २०२१ पासून ०८ मे २०२१ पर्यंत वितरित / पाठवण्यात आल्या आहेत.
कॅनडा, थायलंड, नेदरलँड, ऑस्ट्रिया, चेक प्रजासत्ताक, इस्राईल, अमेरिका, जपान, मलेशिया, यूएस (गिलिएड), यूएस (सेल्सफोर्स) आणि थायलंडमधील भारतीय समुदायाकडून ८ मे २०२१ रोजी प्राप्त झालेल्या मुख्य वस्तू:
ऑक्सीजन काँसंट्रेटर्स (२४०४)
रेमडेसिव्हीर (२५,०००)
व्हेंटीलेटर्स (२१८)
चाचणी कीट (६,९२,२०८)
न्युज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे