फुले दांपत्याच्या जीवनावरील मालिकेचे प्रसारण थांबवावे लागणे ही शोकांतिका :मोहन गायकवाड

पुरंदर दि.३ जानेवारी २०२१ : फुले दांपत्याच्या जीवनावरील मालिकेचे प्रसारण थांबवावे लागणे ही शोकांतिका  असल्याची खंत पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी व्यक्त केले आहे  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम खानवडी येथे संपन्न झाला.यावेळेस यावेळी झालेल्या कार्यक्रमात  मोहन गायकवाड यांनी ही खंत व्यक्त केली.
महात्मा फुले यांचे गाव असलेल्या पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली  पंचायत समिती पुरंदरच्या सभापती नलिनी लोळे ,जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे, पंचायत समिती सदस्य सुनीता काकी कोलते, उद्योजक हरिभाऊ लोळे  सुनील धिवार आदि मान्यवरांच्या उपस्थितीत  महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तदनंतर  शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या स्वतंत्र सत्कार कार्यक्रम पार पडला.यावेळी ग्रामपंचायत भिवडी तर्फे कोविडयोध्द्यांना प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देण्यात आले. तसेच बालिका दिनानिमित्त महिला व बालकल्याण विभागातर्फे २ नवजात बालिकेचे मातेसह स्वागत करण्यात आले. व त्यांना नवीन वर्षाची भेट ही देण्यात आली. आजचा दिवस महिला शिक्षक दिन म्हणुनही उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी बोलताना ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील वरील मालिका टिआरपी साठी बंद होते यासारखी दुसरी शोकांतिका नाही असे मत मोहन गायकवाड  यांनी मांडले. समाजाने यावर विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमुद केले. सावित्रीबाई फुले यांनी खडतर परिस्थितीत केलेल्या अतुलनीय कार्याचा आढावा घेऊन आज सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले .याप्रसंगी कुंभारवळण शाळेच्या उपशिक्षिका शीतलताई खैरे यांनी थेट मुख्यमंत्री महोदयांनी संवाद साधून ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणा बद्दल आपले मत व्यक्त केले होते आणि शैक्षणिक पाठही उत्तम रित्या घेतला होता . त्याबद्दल त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला .तसेच वाळुंज केंद्रातील शिवरी शाळेतील आदर्श शिक्षिका आरती सोनवणे यांचा ही सेट नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला . यावेळेस कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे  जिल्हा परिषद  खानवडी शाळेला पुस्तके भेट देण्यात आली. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाईंची हुबेहुब रांगोळी काढणारे मीरा कुंजीर ,स्नेहल गद्रे, रोहिणी टिळेकर, सुवर्णा  मेमाने व श्याम कुमार मेमाने यांचाही सन्मान करण्यात आला. या सावित्रीच्या लेकी मार्फत ज्ञानाचा वारसा पुढे असाच चालत राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी विस्ताराधिकारी  पांडुरंग मेमाणे, श्री कुंभार वि अ पंचायत, केंद्रप्रमुख विठ्ठल गुरव,  प्रशासक अधिकारी काकडे साहेब ,श्री कारकूड  आरोग्य विस्तार अधिकारी, ग्रामसेवक जगताप अंगणवाडी सुपरवायझर, भाऊ खोमणे, सचिन होले, नितीन होले, खानवडी ग्रामस्थ ,पुरंदर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष  गणेश  लवांडे,शिक्षक संघटना प्रतिनिधी , शिक्षक आदी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब फडतरे यांनी  तर आभार श्यामकुमार मेमाने यांनी मानले
 न्यूज अनकट प्रतिनिधी:  राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा