मुंबई, १० ऑगस्ट २०२१: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क फोर्ससोबतची बैठक संपली आहे. राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट मॉल्स यांना शिथिलता देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीच महत्वाची आणि सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीत संपूर्ण राज्याचा आढावा घेण्यात आला. हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि मॉल्सच्या नियमांमध्ये काही शिथिलता देण्याबाबत टास्क फोर्स लवकरच नवी नियमावली तयार करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि मॉल्सच्या नियमांमध्ये काही शिथिलता देण्याबाबत टास्क फोर्स लवकरच नवी नियमावली तयार करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
कालच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील संपूर्ण करोना स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास, डॉक्टर संजय ओक, डॉक्टर शशांक जोशी, मेहुल मेहता, डॉक्टर झहीर विराणी, डॉक्टर राहुल पंडित, वसंत नागवेकर, डॉक्टर सुहास प्रभू, डॉक्टर अजित देसाई, ओम श्रीवास्तव, डॉक्टर उदवाडिया हे उपस्थित होते.
टास्क फोर्सच्या बैठकीत संभाव्य तिसरी लाट, ऑक्सिजनची लागणारी गरज, लसीकरणाचा वेग वाढवणे, ट्रेसिंग, ट्रॅकिंग वाढवणे या विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली. तसेच येणाऱ्या काळात आणखीही काही क्षेत्रांच्या बाबतीत सावधानता बाळगून कशा प्रकारे निर्बंधात शिथिलता आणायची यावरदेखील या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. कालच्या बैठकीतील सूचनांच्या अनुषंगाने टास्क फोर्स नियमावली तयार करणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे