जालना ११ मार्च २०२४ : आचारसंहिता लागायला चार-पाचच दिवस बाकी असल्याचं मोठं व्यक्ताव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात केलंय. दानवे यांच्या हस्ते जालन्यात १०१ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी दानवे बोलत होते.
१४, १५ आणि १६ या तीन दिवसात आचारसंहिता लागणार, त्या नंतर खऱ्या अर्थाने पुढची दिशा सुरू होणार असल्याचं दानवे यांनी म्हटलंय. आपण 72 कोटी रुपये जालन्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणले असून त्याचे दोन तीन दिवसात उद्घाटन करण्यात येणार असल्याच देखील दानवे यावेळी बोलतांना म्हणाले. दरम्यान रावसाहेब दानवे यांनी दिलेल्या आचारसंहितेच्या संकेतानंतर आता राजकीय नेते आणि पदाधिकारी चांगलेच कामाला लागले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी