सहा राज्यांतील सात विधानसभा जागांवर पोटनिवडणूकीसाठी मतदान सुरू

नवी दिल्ली, ५ सप्टेंबर २०२३ : देशातील सहा राज्यांतील विधानसभेच्या सात जागांवर पोटनिवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. या विधानसभा जागांमध्ये उत्तर प्रदेशातील घोसी, पश्चिम बंगालमधील धुपगुरी, केरळमधील पुथुपल्ली, उत्तराखंडमधील बागेश्वर, झारखंडमधील डुमरी आणि त्रिपुरातील बाॅक्सनगर आणि धनपूर यांचा समावेश आहे, आठ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारी ही पोटनिवडणूक भाजप आणि इंडिया आघाडीसाठी महत्वाची लढाई मानली जात आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेशमधील घोसी येथील जागेकडेही अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. या जागेवर भाजप आणि समाजवादी पक्षामध्ये मुख्य लढत होत आहे.

धुपगुरी, पुथुपल्ली, बागेश्वर, डुमरी आणि बाॅक्सनगर येथील विदयमान आमदारांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. तर घोसी आणि धनपूरच्या आमदारांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. सपा आमदार दारा सिंह चौहान यांच्या राजीनाम्यामुळे घोसीमध्ये पोटनिवडणूक होत आहे. सपचा राजीनामा दिल्यानंतर दारा सिंह चौहान यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता घोसी पोटनिवडणुकीत भाजपने दारा सिंह यांना विरोधात उभे केले आहे. दारा सिंह हे सपाचे उमेदवार सुधाकर सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा