त्रिपुरा, ७ जुलै २०२० : बांबू उत्पादनामुळे त्रिपुरा प्रादेशाची प्रतिमा वाढली आहे. पर्यावरणपूरक अशी आणि स्थानिक बांबू कारागिरांकडून बनविल्या जाणा-या पाण्याच्या बाटल्यांना देशभरातून आणि बाहेरूनही मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे.
गेल्या आठवड्यात बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने एक बाटली खरेदी करून आणि स्थानिकांना उदरनिर्वाह करण्याच्या या उपक्रमाचे कौतुक करून प्रसिद्धी दिल्यानंतर या बांबूपासून बनवलेल्या पाण्याच्या बाटल्यांना मोठी लोकप्रियतेला मिळत आहे, व त्याची मागणीही वाढत आहे.
भारतीय वन सेवा (आयएफएस) अधिकारी आणि त्रिपुरा पुनर्वसन वृक्षारोपण महामंडळाचे अध्यक्ष (टीआरपीसी) प्रसाद राव वड्डारपू हे या प्रकल्पातील मास्टरमाइंड आहेत. प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी त्यांनी बरेच नमुने तयार केलै , उपलब्ध साहित्यात त्यांनी संशोधन केले, आणि बांबू व क्राफ्ट्स डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट (बीसीडीआय) आणि सेंटर ऑफ फॉरेस्ट लाइव्हलीहुड अँड एक्सटेंशन (सीएफआरई) कडून त्यांना मदत मिळाली.
श्री. राव यांनी आकाशवाणीला दिलेल्या माहितीत सांगितले की, बांबूच्या बाटल्या बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या उत्पादनांपेक्षा अधिक उत्कृष्ट आहेत कारण त्यांचे योग्य संशोधन करून प्रयोग केले जातात आणि बांबूच्या पृष्ठभागावर थेट पाणी साठवत नाही. या प्रकल्पांतर्गत राज्यातील विविध भागांतील दहा पारंपारिक कारागीरांचा समूह कार्यरत आहे, असे श्री. राव यांनी सांगितले.
पंतप्रधान वन धान योजनेचा आढावा घेता राज्य आता बांबूच्या पाण्याच्या बाटल्या तयार करण्याचे काम सहा महिन्यांपासून करीत असल्याचे त्यांनी सांगितले. बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन यांनी मागितलेल्या एका बाटलीसह सुमारे १०० बाटल्यांची पहिली खेप देशाच्या विविध भागात पाठविण्यात आली आहे, असे राव म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी