राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत अण्णांच्या आंदोलनाचे प्रमुख नेते काय करत आहेत?

कन्याकुमारी, १० सप्टेंबर २०२२: काँग्रेस पक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते कश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढत आहे. यादरम्यान स्वराज्य इंडियाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते अन्नांच्या आंदोलनाचे प्रमुख नेते योगेंद्र यादव हे देखील या यात्रेत सामील झाले आहेत.

योगेंद्र यादव यांना वृत्तवाहिनी माध्यमांनी प्रश्न विचारला की काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेत तुम्ही सहभागी होण्याचे कारण काय आहे?
त्यावर योगेंद्र यादव उत्तर देतात की मी काँग्रेस पक्षाचा अजिबात नाही, पण मी माझ्या पक्षाचा बिल्ला (अजेंडा) घेऊन या यात्रेत चालत आहे. देश तोडण्याऐवजी संघटित करत आहे. ही यात्रा देश जोडत आहे म्हणून मी आज इथं आलो आहे, उद्या इतर पक्षांनी असा प्रयत्न केला तर आम्ही त्यांनाही पाठिंबा देऊ असं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिल आहे. तसेच यादव पुढे बोलतात भारत जोडो यात्रेबाबत संपूर्ण विरोधक सरकारला आव्हान देऊ शकतात या क्रमानेच काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे भारत जोडो उपक्रम राबवण्याची गरज आहे.

देशातील मोठी माध्यम या प्रकरणाचा वार्तांकन दाखवणार नाही असा माझा विश्वास आहे पण देशाला वाचवायचा असेल तर सध्याच्या सत्ताधारी पक्षाला सत्तेतून खाली आणण्याची गरज आहे तरच देश वाचेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा