दक्षिण आफ्रिका विरुद्ध दुसरा सामना जिंकत, टीम इंडियाने मालिका जिंकली

पुणे, ३ ऑक्टोबर २०२२ : तीन सामन्याचे टी ट्वेंटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा १६ धावांनी पराभव करत मालिका जिंकली आहे. यासोबतच भारतीय संघाने प्रथमच मायदेशात दक्षिण आफ्रिकेला मालिकेत पराभव केले.

दरम्यान कालच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २३७ धावांचा डोंगर उभारला होता. प्रतिउत्तरात आफ्रिकेच्या संघाने चांगली झुंज दिली. मात्र ते विजयी होऊ शकले नाहीत. आफ्रिकेचा संघ २० षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात २२१ धावाच करू शकला.

दरम्यान दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. रोहित आणि राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ५९ चेंडू ९६ धावांची भागीदारी केली. त्यानंतर विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी डावाची सुत्रे आपल्या हाती घेतली. त्यांनी अक्षरशः विरोधी गोलंदाजीची पिसे काढत षटकार -चौकारांचा पाऊस पडला.या दोघांनी शतकीय भागीदारी केली, तर यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने २३७ धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून के राहुलने ५७ धावा रोहित शर्माने ४३ धावा विराट कोहलीने नाबाद ४९धावा सूर्यकुमार यादवने ६१ धावा तर कार्तिकने नाबाद १७ धावा केल्या

या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात पाहिजे तशी झाली नाही. कर्णधार टेबां बवूमा एकही धावा न करता बाद झाला. त्याचबरोरच रायली रसोही खाते ही खोलू शकला नाही. त्यानंतर एडीन माकरण ने १९ चेंडूत आक्रमक ३३ धावा केल्या.त्यानंतर डीकॉक ने डेविड मिलरसह डावाची धुरा सांभाळली या दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी शतकीय भागीदारी झाली, मिलरने शानदार शतक झलकवले त्यांनी ४७ चेंडू १०६ धावांची अप्रतिम खेळी खेळली, तर क्विंटन डीकॉकने ६९ धावा केल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा