जालना शहरातील कैकाडी मोहल्ला येथे तरुणावर चाकू हल्ला

जालना १९ ऑगस्ट २०२४ : जालना शहरातील कैकाडी मोहल्ला येथे एकावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडलीय. यात एक जण जखमी झाला असून त्याला जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. सागर पालटे रा. मोरडी मोल्ला असे जखमी झाल्या तरुणाचे नाव आहे.

सागर पालटे याच्यावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला का केला? हे अद्याप समजू शकलेले नाहीये. दरम्यान या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले आहेत. ते घटनेचा तपास करताय. या घटनेमुळे जालना शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

न्युज अनकट प्रतिनीधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा