झिम्बाब्वेने यूएसएला ३०४ धावांनी हरवले, वनडे इतिहासातील दुसरा मोठा विजय

हरारे, झिम्बाब्वे २७ जून २०२३: झिम्बाब्वे संघाने युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) चा ३०४ धावांनी पराभव केला. या विजयासह झिम्बाब्वेने क्वालिफायरच्या सुपर-६ मध्ये प्रवेश केला. यासह झिम्बाब्वेने विश्वचषक पात्रता फेरीत एकदिवसीय इतिहासातील दुसरा मोठा विजय नोंदवला आहे. झिम्बाब्वेने वनडेत सर्वोच्च धावसंख्या केली आहे. संघाने प्रथमच ४०० हून अधिक धावा केल्या. यापूर्वी, संघाची सर्वोच्च धावसंख्या ३५१ होती, जी झिम्बाब्वेने २००९ मध्ये केनियाविरुद्ध केली होती.

वनडेतील सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम भारतीय संघाच्या नावावर आहे. टीम इंडियाने १५ जानेवारी २०२३ रोजी श्रीलंकेचा ३१७ धावांनी पराभव केला. हा सामना तिरुवनंतपुरममध्ये खेळला गेला. झिम्बाब्वेचा एकदिवसीय क्रिकेटमधला हा सर्वात मोठा विजय आहे, तर जागतिक क्रिकेटमधील दुसरा सर्वात मोठा विजय आहे.

एकतर्फी झालेल्या या सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार शॉन विल्यम्सने शतक झळकावले. त्याने १०१ चेंडूत १७४ धावा केल्या. या डावात २१ चौकार आणि ५ षटकार मारले. सुरवातीस हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये सोमवारी झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४०८ धावा केल्या. प्रत्युत्तरात अमेरिकेचा संघ केवळ १०४ धावाच करू शकला. ​​या मोठ्या विजयासह झिम्बाब्वे सुपर सिक्स मध्ये पोहोचला.

‘अ’ गटातील झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि नेदरलँड्स संघ सुपर-६ टप्प्यात पोहोचले आहेत. ग्रुप स्टेजमध्ये अजून ३ सामने बाकी आहेत, ते सुपर-६ चे वेळापत्रक ठरवतील. सुपर-६ टप्पा २९ जूनपासून सुरू होणार आहे. येथून २ संघ अंतिम फेरीत पोहोचतील, हे २ संघ भारतात होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकासाठी देखील पात्र ठरतील. ब गटातील ३ संघ सुपर-६ मध्ये पोहोचले आहेत. श्रीलंका आणि स्कॉटलंड प्रत्येकी ६ गुणांसह पात्र ठरले. दुसरीकडे ओमाननेही ४ गुण घेत सुपर-६ मध्ये स्थान मिळवले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा