समाजाचे प्रतिबिंब म्‍हणून काम करण्‍याची गरज: विजय पाटील

बारामती : प्रसारमाध्यमे शासन, प्रशासन आणि समाज यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करत असतात. पत्रकारितेने समाजाचे प्रतिबिंब म्हणून काम केल्यास खऱ्या अर्थाने  समाजाला न्याय मिळेल व समाजाचा विकास होईल,  असे प्रतिपादन तहसीलदार विजयपाटील यांनी केले.
पत्रकार संघ, बारामती व पुणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनेयेथील प्रशासकीय भवनातील बारामती उपमाहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकरयांच्या स्मृतिदिनी पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या सुरूवातीला आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर यांच्‍याप्रतिमेस पुष्‍पहार अर्पण करून त्‍यांना अभिवादन करण्‍यात आले.
यावेळी बारामती पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर जन्‍नु,  उपाध्यक्ष डॉ. विजय भिसे, सचिव तैनुर शेख,  माहिती सहाय्यक विलास कसबे, विशाल कार्लेकर,अमित खडतरे,  भीमराव गायकवाड यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. समाजातील समस्या मांडून अस्वस्थता कमी करण्याचे काम पत्रकारितेतून होत असते. पत्रकारांनी नेहमी पारदर्शकता ठेवून कामे केली पाहिजेत. आपण जे काही आपल्या लेखणीतून मांडत असतो. त्यातूनच समाजाचे हित जोपासले जाते असेही त्‍यांनी शेवटी सांगून सर्वांना पत्रकार दिनाच्‍या शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार दत्ता महाडीक व संपादक तानाजी पाथरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तैनुर शेख यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. विजय भिसे यांनी मानले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा