चमोली दुर्घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाखांची मदत

नवी दिल्ली, ८ फेब्रुवरी २०२१: उत्तराखंडच्या चमोली येथे सात वर्षानंतर निसर्गाने पुन्हा एकदा कहर दाखवला आहे. हिमनग फुटल्याने मोठा विध्वंस झालं आहे. चमोलीतील रेणी गावाजवळील हिमनग तुटल्याने दीडशेहून अधिक लोक वाहून गेले आहेत. हे सर्व लोक ऋषी गंगा पॉवर प्रकल्पात काम करत होते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाखांची मदत जाहीर केली आहे.

उत्तराखंडमधील चमोली येथे हिमनग कोसळून झालेल्या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकी २ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना प्रत्येकी ५०,००० रुपयांची मदतही पंतप्रधानांनी मंजूर केली आहे.

ट्विट करत दिली माहिती

“पंतप्रधान नरेंद्र मोदी @narendramodi यांनी उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना प्रत्येकी ५०,००० रुपयांची मदतही मंजूर केली आहे.” असे पंतप्रधान कार्यालयाने ट्विटर वर सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा