सातारा येथील यवतेश्वर घाटातील ५ टनी दरड हटवली

सातारा, २५ जुलै २०२३ : सातारा-कास मार्गावर यवतेश्वर घाटातील धोकादायक दरडी महसूल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त मोहीम राबवून हटवल्या आहे.
डोंगरमाथ्यावरील सुमारे ५ टनांहून अधिक वजन असलेल्या दरडींचा सुळका पडून मार्गावर सुमारे ३ फुट खोल खड्डा पडला होता. जोरदार दणक्यामुळे मार्ग दुभंगला. संरक्षक कठडा तोडून ही दरड दरीमध्ये कोसळली. यवतेश्वर जवळील डोंगरमाथ्यावरील ५-६ दरडी प्रशासनाने हटवल्याने धोका टळला असुन लोकांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या दोन -चार वर्षात या भागात अतिवृष्टी होऊन भूस्खलन, जमीन खचणे, दरडी कोसळणे असे प्रकार वाढले आहेत. घाट मार्गावरील झीज झालेले मोठमोठे दगड दरडी बनून मार्गांवर कोसळत आहेत. घाटातील कामांसाठी ब्लास्टिंग, ब्रेकरचा वापर झाल्याने रस्त्याकडील भाग ठिसूळ होऊन तो मलबा रस्त्यावर येत होता.

सांबरवाडी डोंगर माथ्यावरील इतर दरडीही दरीत ढकलून देण्यात आल्या. मार्गांवर पडून राहिलेल्या दरडी जेसीबीच्या साह्याने हटवण्यात आल्या. छोट्या दरडी पॉकलेनच्या सहाय्याने उचलून डोंगरमाथ्यावर व्यवस्थित ठेवण्यात आल्या. दरडींमुळे सातारा-कास या नव्या मार्गांची व संरक्षक भिंतीची काही ठिकाणी दुरवस्था झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्तीचे कामहाती घेतले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा