१० रुपयाच्या थाळीसोबत २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस ! 

मुंबई: राज्य सरकारची महत्वकांशी योजनांपैकी शिवभजन योजना ही गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत राहिली आहे. या योजनेला कालपासून सुरुवात करण्यात आली. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. योजना सुरु होताच यावर विरोधी पक्षांकडून टीका होण्यास सुरुवात झाली आहे. यावर पहिली टीका मनसेकडून करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या या योजनेवर मनसेने टीका केली आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवभोजन योजनेचे उद्धाटन करून जेवणाचा आनंद लुटला होता. याची माहिती आव्हाड यांनी स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केली होती. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून माहिती देताना म्हटले होते की, “आज मनीषा नगर येथील नागरिकांसाठी “शिवभोजन” योजनेचे उदघाटन केले व मी स्वतः भोजनाचा स्वाद घेतला. गरीब व गरजू जनतेला फक्त दहा रुपयात दर्जेदार आहार भेटावं. हेच आमच्या महाविकास आघाडी सरकारचे उद्दिष्ट आहे.”

आव्हाडांच्या या ट्विटचा दाखला देत मनसेने त्यांच्यावर टीका केली आहे. आव्हाड यांच्या ट्विटमध्ये ते जेवत असून त्यांच्यासमोर बिसलेरी बॉटल दिसत आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी या कार्यक्रमाचा फोटो ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. १० रुपयाच्या थाळीसोबत २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस ! ‘ अशा बोचऱ्या शब्दात अमेय खोपकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे.

आव्हाडांचा फोटो शेअर करीत खोपकर म्हणाले की, तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता की, जितेंद्र आव्हाड हे शिवथाळी उद्धाटनावेळी जेवत असताना त्या टेबलवर बिसलेरी पाण्याची बॉटल ठेवण्यात आली आहे. याच मुद्द्यावर बोट ठेवून मनसेने आव्हाडांवर टीका केली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा