परदेशी नागरिकांना आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू

मुंबई, दि. ५ मे २०२० : २५ मार्च नंतर देशांतर्गत आणि देशाबाहेर बरेच भारतीय नागरिक अडकलेले आहेत. त्यातील देशांतर्गत अडकलेल्या स्थलांतरित मजुरांचा प्रश्न राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या सहयोगाने सुटलेला दिसत आहे. स्थलांतरित मजुरांसाठी केंद्र सरकारने विशेष श्रमिक रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत आतापर्यंत हजारो श्रमिकांना त्यांच्या गावी पोहोचवण्यात आले आहे.

परंतु देशाबाहेर अडकलेल्या भारतीय नागरिकांना देशात आणण्यासाठी अद्याप कोणताही निर्णय घेतला गेलेला नव्हता. याला अनुसरून आज उद्धव ठाकरे यांनी त्यासंबंधात एक फॉर्म तयार केला आहे. देशाबाहेर अडकलेल्या राज्यातील नागरिकांना विमानाने परत मायदेशात आणण्यासाठी सरकारकडून हे प्रयत्न सुरू झाले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी अशा सूचना दिल्या आहेत की, ‘आपली संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर, ज्यावेळी भारत सरकारकडून विमानाने परदेशातील लोकांना भारतात परत आणण्यास सुरवात होईल, आम्ही आपल्या परतीच्या प्रवासासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधू.’ यामुळे आता परदेशात अडकलेल्या नागरिकांना देखील दिलासा मिळणार आहे.

फॉर्म भरण्यासाठी ची लिंक: https://t.co/CTiOJutyqh?amp=1

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा