शासकीय नियमांचे पालन करत गळनिंब येथे पार पडला विवाह सोहळा

श्रीरामपूर, दि.६ मे २०२०: श्रीरामपुर तालुक्यातील गळनिंब येथे प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक ठकाजी रहुनाथ ढोणे यांचे चिरंजीव आकाश व कै. दगडू थोरात यांची कन्या श्रद्धा यांचा शुभविवाह आज कोरोनोमुळे सोशल डिस्टंसिंगचे पालन करत पार पडला.

या विवाह सोहळासाठी खासदार डॉ सुजय विखे पाटील उपस्थित होते. त्यांनी नववधू वरांना शुभाशिर्वाद दिले. अवघ्या वीस लोकांत हा विवाह संपन्न झाला.

यावेळी ढोणे परिवारांकडुन पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी २१हजार रुपयांचा धनादेश खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

प्रवरा परिसरात हा विवाह सोहळा कोरोनो मध्ये एक आदर्श ठरला आहे. यावेळी सुजय विखे पाटील म्हणाले की, सध्या जगभर कोरोनाचे संकट आपल्यावर आहे. त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे . असे विवाह कोरोनोमध्ये होत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. परंतु हा पांयडा नागरिकांनी कायम ठेवत कोरोनो संपन्न झाला. तरी नागरिकांनी असे साधे पद्धतीने विवाह सोहळा करावे, असे आवाहन विखे यांनी केले.

न्युज अनकट प्रतिनिधी – दतात्रय खेमनर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा