मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदारकीचा मार्ग मोकळा

बिनविरोध होणार निवडणूक

मुंबई, दि.१३ मे २०२० :मोठ्या राजकीय घडामोडीनंतर राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ९ जागांसाठी दाखल झालेल्या १४ अर्जापैकी १ अर्ज बाद झाला. शिवाय भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

भाजपने अर्ज मागे घेतानाही भाजप घोषित उमेदवार डॉ.अजित गोपछडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. आणि त्यांच्या जागेवर रमेश कराड या राखीव उमेदवाराचा अर्ज पक्षांकडून कायम करण्यात आला आहे.
तर महाविकास आघाडीकडून अधिकृत ५ तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे २ डमी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

तर भाजप कडून चार अधिकृत तर दोन डमी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून डमी अर्ज भरलेले किरण पावस्कर व शिवाजी गर्जे यांनी उमेदवारी मागे घेतली. शेवटी शाहबाज राठोड या अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला खरा. मात्र त्याचा अर्ज आमदारांच्या सूचक व अनुमोदक म्हणून सह्या नसल्यानं बाद करण्यात आला आहे.

दिल्लीतून भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली होती. त्यामध्ये चार उमेदवारांचे नाव घोषित करण्यात आलं होतं. मात्र, ऐनवेळेला अजित गोपछडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आणि त्यामुळे राखीव उमेदवार रमेश कराड यांचा अर्ज कायम करण्यात आला आहे. त्यातच संदीप लेले यांनीही उमेदवारी मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

बिनविरोध झालेले विधान परिषद आमदार

शिवसेना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नीलम गोऱ्हे

भाजप
प्रवीण दटके,
रमेश कराड,
गोपीचंद पडवळकर,
रणजीतसिंह मोहिते पाटील

राष्ट्रवादी
अमोल मिटकरी
शशिकांत शिंदे

काँग्रेस-
राजेश राठोड

न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा