औरंगाबादेमध्ये कोरोना रुग्ण संख्या @ ९००

Imagen de computadora del coronavirus

औरंगाबाद, दि.१६ मे २०२० : औरंगाबाद शहरात आज (शनिवारी) दुपारी २८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९००वर पोहोचली आहे. असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सकाळी ३० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. आता पुन्हा २८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा ९०० वर पोहचला आहे.

औरंगाबाद शहरातील आता आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
कैलास नगर (१), चाऊस कॉलनी (१), मकसूद कॉलनी (२), हुसेन कॉलनी (४), जाधववाडी (१), न्यू बायजीपुरा, गल्ली नं.३ (१), एन सहा, संभाजी कॉलनी, सिडको (१), कटकट गेट (), बायजीपुरा (१०), अमर को- ऑपरेटिव्ह सोसायटी, एन आठ, सिडको (२), लेबर कॉलनी (१), जटवाडा (१), राहुल नगर (१) आणि जलाल कॉलनी (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये १६ पुरुष आणि १२ महिला रुग्णांचा समावेश असल्याचेही त्यांनी कळविले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा