जिल्हा परिषदेची शासकीय निवासस्थाने तात्काळ रिकामे करा

जालना, दि.३० मे २०२०: जालना जिल्हा परिषदेच्या मोतीबाग परिसरात असलेली शासकीय निवासस्थाने निवृत्तीनंतरही रिकामे करून न देणाऱ्या ४० जणांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निवासस्थान तात्काळ रिकामे करण्याच्या नोटिसा बजाविल्या आहेत.

मोतीबाग परिसरात जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी जवळपास १०० निवासस्थाने बांधलेली आहेत. यापैकी ४० कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत. तर अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. असे असतानाही त्यांच्या परिवाराने किंवा खुद्द निवृत्त कर्मचाऱ्यांनी शासकीय निवासस्थाने रिकामे करून दिलेले नाहीत. निवृत्त असल्याने त्यांच्या वेतनातून निवासस्थानाचे भाडे सुध्दा वसूल केल्या गेलेले नाही.

विशेष म्हणजे मागील वर्षीच या सर्वांना नोटिसा बजावून निवासस्थाने रिकामे करण्यास नोटिसाद्वारे सांगितले होते. मात्र त्यावेळी पाऊस तोंडावर असल्याने पावसाळा संपल्यावर रिकामे करण्याचे आश्वासन संबंधितानी दिले होते अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभाग प्रमुखाना मुख्यालयी हजर राहण्याचे निर्देश दिलेले आहेत. मात्र त्यांना राहण्यासाठी क्वॉर्टरच उपलब्ध नाहीत. त्यामुळे सदर क्वॉर्टर तात्काळ रिकामे करण्याच्या नोटिसा दिल्याचे अरोरा यांनी सांगत, दोन दिवसांची मुदत दिली असून ती आज संपणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा