मुंबई, दि. १ जून २०२०: आज “पालकांचा जागतिक दिवस” (ग्लोबल डे ऑफ पेरेंट्स) आहे आणि या निमित्ताने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या किशोर दिवसांचे संस्मरणीय छायाचित्र इंस्टाग्रामवर पोस्ट करत एक अत्यंत भावनिक संदेश लिहिला आहे. सर्वप्रथम संयुक्त राष्ट्र संघाने पालकांचा ग्लोबल डे साजरा करण्यास सुरुवात केली. मुलांबद्दल पालकांचे समर्पण लक्षात घेता हा दिवस दर वर्षी १ जून रोजी जगभर साजरा केला जातो. कोरोनाव्हायरसमुळे लॉकडाऊन झाल्यामुळे आता संपूर्ण देशातील नागरिक आपल्या घरापुरते मर्यादित आहे. अशा काळात सचिन तेंडुलकरने दिलेला हा संदेश दर्शवतो की मास्टर ब्लास्टर मानवी मूल्यांना किती महत्त्व देतो.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर आपल्या किशोरवयातील एक ह्रद्यस्पर्शी फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो आपल्या आईवडिलांच्या मांडीवर झोपलेला आहे आणि हा प्रसंग त्याने फोटोमध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला आहे. हा फोटो कोणी काढला आहे हे तर माहीत नाही. परंतु एवढे नक्की की हा फोटो खूप प्रेरणा देतो आणि आजच्या युवकांसमोर एक आदर्श निर्माण करत आहे.
सचिनने या पोस्टवर म्हटले आहे की, आपण लहानाचे मोठे होतो आणि एक व्यक्ती म्हणून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करतो. परंतु लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत आपले माता पिता आपल्याला निस्वार्थी प्रेम करत असतात. प्रत्येक गोष्टीत आपल्याला आधार देतात व मार्गदर्शन करत असतात. याचप्रमाणे माझ्या आईवडिलांनी देखील माझ्या आयुष्यात मोलाचे योगदान दिले आहे. वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. मी आज जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे. सचिनने पुढे असेही लिहिले की अशा कठीण काळात जेव्हा आपल्या पालकांना आपली सर्वात जास्त गरज असते तेव्हा त्यांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. विशेषतः अशा कठीण काळात.
सचिन केवळ मैदानावरच मास्टर-ब्लास्टर नाही तर सामाजिक मूल्य व घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये देखील तो मास्टर-ब्लास्टर आहे हे या पोस्टमधून दिसून येते.
न्यूज अनकट प्रतिनिधी