हत्तीण हत्याकांड प्रकरण : गुन्हेगारांना पकडून दिल्यास १ लाखाचे बक्षीस

केरळ, दि. ४ जून २०२०: फळांमध्ये स्फोटके ठेवून जनावरांची हत्या करण्याच्या प्रथेला बंद करण्यासाठी वाइल्ड लाइफ एसओएस ने आवाज उठविला आहे. स्फोटके असलेली हि फळे वन्यप्राण्यांच्या तोंडामध्ये फुटून त्यांचा मृत्यू होतो. वाइल्ड लाइफ एसओएसची मागणी आहे की अशा गुन्ह्यांवर बंदी घाला. केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यात संघटनेने गर्भवती हत्तीणीच्या हत्येचा निषेध केला आहे.

मल्लपुरममध्ये घडलेली ही घटना निराशाजनक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या घटनेतील दोषींना शिक्षा व्हावी हे आपण ठरविले आहे. दोषींवर गुन्हा दाखल केला जाईल. आम्ही अधिकाऱ्यांना तपासणीत सहकार्य करू. आम्ही संपूर्ण प्रक्रियेत सहकार्य करू. असे आश्वासन या संस्थेने दिले आहे.

प्राथमिक तपासणीत गर्भवती हत्तीणीच्या तोंडात जखमा झाल्याचे आणि बॉम्बमुळे जीभ तुटल्याचे दिसून आले आहे. तिने अननसामध्ये लपविलेले स्फोटके चघळली आणि तीन दिवसानंतर तिचा मृत्यू झाला.

गुन्हेगारांना पकडून दिल्यास १ लाखाचे बक्षीस

हत्येमध्ये सहभागी आरोपींना पकडण्यासाठी वाइल्ड लाईफ एसओएसने एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. या प्रकरणात जो कोणी वनविभागास मदत करेल त्याला वाइल्ड लाइफ एसओएसकडून हे बक्षीस देण्यात येईल.

यासंदर्भात संस्थेनेही एक क्रमांक जाहीर केला आहे. संघटनेने म्हटले आहे की हत्ती वाचवण्याच्या मोहिमेमध्ये आपल्याला सामील व्हायचे असेल तर एलिफंट हेल्पलाइन क्रमांकावर + 91-9971699727 वर कॉल करा किंवा info@wildlifesos.org वर मेल करा.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा