पुरंदर तालुक्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये: रूपाली सरनोबत

पुरंदर, दि. २२ जून २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुंरदर तालुक्यात सध्या अफवांचे पेव फुटले आहेत. सासवड शहर बंद राहणार असल्याच्या अफवा पसरल्यानंतर त्याचे खंडण करत तहसिलदार रूपाली सरनोबत यांनी सासवड शहरासह तालुक्यातील कोणतेही गाव सील करणार नसल्याचे सांगत कोणीही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला असून पुणे जिल्ह्यातही कोरोना विषाणूचा प्रसार झालेला आहे .कोरोना विषाणू (covid-19) चा प्रसार होऊ नये म्हणून पुरंदर तालुक्यात प्रशासना मार्फत विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. तसेच पुरंदर तालुक्यात एकूण २६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले असून त्यापैकी ३ रुग्ण मयत झालेले आहेत. तसेच ९ रुग्णांना उपचाराअंती घरी सोडण्यात आलेले आहे. उर्वरित १४ कोरोनाग्रस्त रुग्ण हे पुणे येथील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. या व्यतिरिक्त आज रोजी पुरंदर तालुक्यात कोणीही कोरोनाचे रुग्ण नाहीत .

कोरोना रुग्ण ज्या भागात आढळून येतात त्या भागात माननीय इन्सिडेंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी दौंड-पुरंदर यांचेद्वारे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येते. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या आदेशांचे निर्देशांचे पालन पुरंदर तालुक्यात करण्यात येते. पुरंदर तालुक्यातील नागरिकांना आव्हान करण्यात येते की शहर किंवा गाव पूर्णपणे बंद ठेवण्याबाबत व इतर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा कोणत्याही अफवा पसरवू नयेत याबाबत आवश्यक ती माहिती हवी असल्यास प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन तहसिलदार रूपाली सरनोबत यांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा