राज्य शासनाकडून मुंबई बाहेर वसवले जातंय दुसरं आरे

मुंबई : एकीकडे मुंबईमध्ये मेट्रो 3 साठी आरे कॉलॉनीतील झाडे तोडली गेली. त्यातच राज्य सरकरच्यावतीने मुंबईबाहेर दुसरे आरे वसविण्याचा घाट घातला जात आहे. यासाठी सरकारने तब्बल ५१ हजार १५१ वृक्षांची ठाणे, शिळफाटा, गोठेघर यांसह आदि परिसरात लागवड करण्यात आली आहे.
वनविभागाकडून तब्बल ४६ हेक्टरवर या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक वृक्षांसाठी प्रत्येकी १हजार १२८ रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे. या आ सेकंड आरेसाठी जवळपास ६ कोटी २८ लाख रुपये इतका खर्च पुढील तीन वर्षाकरता केला जाणार आहे.
याठिकाणी बाभूळ, जांभूळ, कडुलिंब, कांचन अशा प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच मेट्रोच्या अनेक प्रकल्पांसाठी अनेक ठिकाणी वृक्षतोड करण्यात येणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा