जळगाव मनपात महिन्याच्या पहिल्या बुधवारी ‌‘नो व्हेईकल डे’, प्रदुषणावर मात करण्यासाठी आयुक्तांसह अधिकारी आले पायी

जळगाव ८ डिसेंबर २०२३ : जळगाव शहराचे वाढते प्रदूषण लक्षात घेता शहर महानगरपालिकेतर्फे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी ‌‘नो व्हेईकल डे’ साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या बुधवारी आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांनी महापालिकेत वाहने न आणता पायी चालत आले.

बुधवारीआयुक्त ड़ॉ. विद्या गायकवाड या कार्यालयात पायी चालत आल्यात. तसेच उपायुक्त सा.प्र. अविनाश गांगोडे, उपायुक्त महसुल निर्मला गायकवाड-पेखळे, सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड-भोसले हे ई-व्हेईकल ने तर चंद्रकांत वानखेडे- मुख्य लेखाधिकारी, मारोती मुळे- मुख्य लेखापरिक्षक, अभिजित बाविस्कर- सहाय्यक आयुक्त हे कार्यालयात पायी आले. उदय पाटील प्र. सहाय्यक आयुक्त (आरोग्य विभाग) हे सायकल वर आले तर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी आयुक्त (आरोग्य विभाग) हे सायकल वर आले. महानगरपालिकेचे अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी ई-व्हेईकल व पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करुन या नो व्हेईकल डे चे तंतोतंत पालन केले.

हा उपक्रम महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे घेण्यात आला. यावेळी सायकल, ई-व्हेईकल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने आलेले वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रकाश पाटील, पर्यावरण अधिकारी, अनिल करोसिया व सुयश सोनटक्के यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महानगरपालिकेने राबविलेला नो व्हेईकल डे हा कार्यक्रम १०० टक्के यशस्वी झाला. तसेच इतर शासकीय व खाजगी कार्यालयांनी ह्या कार्यक्रमात सहभागी होऊन या राष्ट्रीय कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : डॉ.पंकज पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा