शांततेत असलेला अशांततेचा भस्मासुर

शांतता आसते काय त्यांना विचारा!
जो शेतात राबतो ३६५ दिवस आणि
पीक नासल्यावर त्याला मिळते ४५ रु
भरपाई,मग जाऊन तो त्याच शेतात एका
दोरीच्या सह्याने स्वताला झुलवतो. तेव्हा
त्याचा बायकोच्या चेहरावरील भाव
सांगून जातात,सगळं मुलाचं सोडाच
शांतता आसते काय त्या कुंटूबाला विचारा…

शांतता आसते काय त्यांना विचारा!
नवं लग्न,स्वप्न,आकांशा तिच्या मनात
आणि त्याची साथ तिला.जेव्हा राहती
गर्भवती आणि दबाव येतो वंशाचा दिवाच्या
पण ती वाढवत आसते पनती त्या पनतीची
ज्योत विझवली जाते.आणि ती मात्र मनात
झिजली जाते
शांतता आसते काय तिला विचारा……

शांतता आसते काय त्यांना विचारा!
जे करुन गेले विचारांची क्रांती
आज आम्ही साजरी करतोय
विकृतीचा अविचारांची होळी
शांतता आसते काय त्या पुतळ्यांना
विचारा…..

शांतता आसते काय त्यांना विचारा!
प्रत्येक सण त्याचा विना साजरा होतो
आली रंगांची होळी पण तिही होते
बेरंगी
कारण तो खेळत आसतो सीमेवर रक्ताची
होळी
शेवटी येतो तो पण त्या चार रंगाच्या तिरंग्यात
शांतता आसते काय त्याचा आईला,दोन वर्षाच्या
निरागस बाळाला आणि बायकोला विचारा शांतता
असते काय……

शांततेच्या रुपात त्यांच्या मनात किती अशांतेच काहूर माजतंय
तरी शांततेंचा सण इथं जोरात गाजतोय
तरी शांततेंचा सण इथं जोरात गाजतोय……

भटक्या

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा